कोकण रेल्वेच्या कॉफी टेबल बुकचं भव्य समारंभात अनावरण

नवी मुंबई: कोकण रेल्वेच्या बेलापूरच्या कॉर्पोरेट कार्यालयात एका विशेष समारंभात कोकण रेल्वेच्या कॉफी टेबल बुकचं अनावरण करण्यात आलं.

या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून प्रख्यात अभिनेते, दिग्दर्शक आणि चित्रपट निर्माते सचिन पिळगांवकर, कोकण रेल्वेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा, संचालक (ऑपरेशन्स आणि कमर्शियल) सुनील गुप्ता आणि मुख्य जनसंपर्क अधिकारी गिरीश आर. करंदीकर उपस्थित होते.

यावेळी कोकण रेल्वेचे अधिकारी आणि कर्मचारीही मोठ्या संख्येने हजर होते.

हे कॉफी टेबल बुक कोकण रेल्वेच्या अभियांत्रिकी चमत्कार, निसर्गरम्य सौंदर्य आणि या प्रदेशावरील परिवर्तनकारी प्रभावाचं एक दृश्य स्मरण आहे.

आकर्षक छायाचित्रे आणि रंजक कथनांद्वारे, हे पुस्तक कोकण रेल्वेच्या एका धाडसी दृष्टिकोनापासून ते पश्चिम किनारपट्टीच्या जीवनरेषेपर्यंतच्या उत्क्रांतीचा इतिहास सांगते.

तसेच, देशभरातील विविध प्रतिष्ठित प्रकल्पांच्या यशस्वी अंमलबजावणीच्या माध्यमातून कोकण रेल्वेची पायाभूत सुविधा क्षेत्रातील अग्रगण्य स्थान अधोरेखित करते.

कोकण रेल्वेच्या अतिशय सुंदर अशा या कॉफी टेबल बुकचं कौतुक होत आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*