कोकण रेल्वेच्या कर्मचाऱ्याची आत्महत्या

रत्नागिरी – एमआयडीसी येथील पुलाखाली कोकण रेल्वेच्या कर्मचाऱ्याने कोणत्यातरी अज्ञात कारणातून आत्महत्या केली.

कर्मचाऱ्यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात आणला होता. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद कऱण्यात आली आहे.

संदीप तानाजी लोंढे (वय ४०, रा. कोकण रेल्वे कॉलनी, रत्नागिरी) असे आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.

ही घटना सोमवारी (ता.४) रात्री साडेबाराच्या सुमारास एमआयडीसी रेल्वे ब्रीज येथे घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार कोकण रेल्वे कर्मचारी संदिप याने कोणत्यातरी अज्ञात कारणातून एमआयडीसी येथील कोकण रेल्वेच्या ब्रीजखाली रेल्वे ट्रकवर आत्महत्या केली.

या प्रकरणी खबर रेल्वे पोलिसांनी ग्रामीण पोलिसांना दिली. माहिती मिळताच ग्रामीण पोलिस घटनास्थळी जाऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केला होता. अधिक तपास ग्रामीण पोलिस अमंलदार करत आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*