आमिरा अशरफ परकार झाली एमबीबीएस

खेड : तालुक्यातील कर्जी गावची सुपुत्री आमिरा अशरफ परकार हिने जुहू मुंबई येथील कुपर मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस परीक्षा उत्तीर्ण केली आहे. आपल्या या यशानं आमिरानं खेडचं नाव उज्ज्वल केलं आहे.

याआधीही आमीरा परकारचे शैक्षणिक आलेख चढाच राहिला आहे. नवी मुंबईतील वाशी येथील फादर एगनल इंग्लिश हायस्कूलमधून एसएससी परीक्षेत ९६ टक्के गुण मिळविले होते. तर बारावीत नवी मुंबईतील नेरुळ येथील एपीजे ज्युनिअर कॉलेजमधून ९४ टक्के गुण प्राप्त केले होते.

डॉ. आमिरा परकार आपल्या यशाचे श्रेय आपले शिक्षक वर्ग, आई वडील, आजी, आजोबा आणि सर्व जवळचे नातेवाईक व हितचिंकांना देत आहे. डॉ. आमीरा परकार भविष्यात एम.डी. पूर्ण करणार आहे. आपल्या शिक्षणाच्या माध्यमातून समाजाची सेवा करण्याची इच्छा तिनं व्यक्त केली आहे.

कर्जी गाव व परिसरातील ग्रामस्थांनी डॉ. आमीराच्या या भरघोस यशाबद्दल तिचं व तिच्या आई-वडिलांचं अभिनंदन व शुभेच्छा दिल्या आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*