खेड येथील मंडल अधिकारी सचिन गोवळकर लाचलुचपतच्या जाळ्यात

रत्नागिरी -खरेदी केलेल्या जमिनीच्या 7/12 वरती नावाची नोंद घालून ती मंजुर करून घेण्यासाठी 72 वर्षीय ज्येष्ठनागरिकांकडून 14 हजारांची लाच घेणाऱ्या भरणे, खेड येथील मंडल अधिकारी सचिन यशवंत गोवळकर याला लाच लुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने बुधवारी रंगेहाथ पकडले.

लाचेचे कारण –
यातील तक्रारदार यांनी खरेदी केलेल्या जमिनीच्या 7/12 वरती तक्रारदार यांचे नावाची नोंद घालून ती मंजुर करून देण्यासाठी लोकसेवक यांनी त्यांच्यासाठी 15,000 रुपयाची लाचेची मागणी करून तडजोडीअंती 14,000 रुपयाची लाच रक्कम आज दिनांक 12/01/2022 रोजी ग्रामपंचायत भरणे या इमारतीमधील मंडळ अधिकारी, कार्यालय येथे स्वीकारल्यानंतर त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले म्हणून गुन्हा नोंद केली.

सापळा अधिकारी श्री. सुशांत चव्हाण- पोलीस उप-अधीक्षक
सापळा पथक- पो.ह. नलावडे, पो ना. हुंबरे, पो.ना. आंबेकर, पो. शि. पवार, चालक पो.शि. कांबळे मार्गदर्शक अधिकारी – *मा. श्री. पंजाबराव उगले सो, पोलीस अधीक्षक, ला ठाणे परिक्षेत्र, ठाणे.

रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, आपल्याला कोणत्याही शासकीय अधिकारी / कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने एखाद्या खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करुन देण्यासाठी अथवा परवानगी मिळवून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.

चला भ्रष्टाचार रोखण्यासाठी प्रयत्न करू

संपर्क

पोलीस उप-अधीक्षक- सुशांत बं. चव्हाण, (9823233044) * लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरी. * कार्यालय संपर्क क्र* – 02352-222893 टोल फ्री क्रं. – 1064, मेल-acbratnagiri@gmail.com

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*