खेड : आदर्श गावातील कर्टेल ग्रामपंचायत आणि गावचे सुपुत्र माजी आमदार मधू चव्हाण, शिवसेना (शिंदे गट) जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच दिनेश परशुराम चव्हाण यांनी आरोग्य आणि आयुष्यमान, आबा कार्ड काढण्यासाठी शिबीर गुरुवारी आयोजित करण्यात आले होते.

खेड तालुक्यातील आदर्श गाव कर्टेल येथील स्वर्गीय सावित्रीबाई बाळकृष्णपंत चव्हाण सभागृहात आरोग्य शिबीर, पंतप्रधान जन आरोग्य योजनेतील आयुष्यमान व आबा कार्ड लाभार्थ्यांचे काढण्यात आले.

शिबिरासाठी शिवसेना (शिंदे गट) जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मनोहर चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत चव्हाण, राधीका चव्हाण, तन्वी चव्हाण, माजी सरपंच शिवराम जागडे, पांडूरंग चव्हाण, पोलीस पाटील अकेश येलवे, आनंद जागडे, रवींद्र जागडे, प्रताप चव्हाण, तुषार चव्हाण, वैद्यकीय समुदाय अधिकारी अभिनय भोजने, डॉ. गजानन कोटकर, आरोग्य सहाय्यक उत्तम देवकाते, निलेश देशमुख, महालॅबचे विलास म्हस्के, श्रुती यादव, अंगणवाडी सेविका प्रविणा चव्हाण, मदतनीस मेघना येलवे, मनिषा वाळंज, टीडब्ल्यूजे चिपळूण चे सौरभ जाधव आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ग्रामपंचायत सरपंच दिनेश चव्हाण यांनी शिबीर घेण्यासाठी उत्तम नियोजन केले होते. संपूर्ण शिबिराचा लाभ गावातील जेष्ठ नागरिक, महिला, तरुणांनी घेतला आहे.

Advertise