दादर येथील बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा रिजनल लाॅयर्स कॉन्फरन्समध्ये कल्पलता भिडे यांचा सन्मान

मुंबई : दादर, मुंबई येथे आज दिनांक १८ एप्रिल २०२५ रोजी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांच्या वतीने आयोजित रिजनल लाॅयर्स कॉन्फरन्सचे थाटात उद्घाटन झाले.

या प्रतिष्ठित कार्यक्रमात प्रख्यात, निर्भीड आणि तडफदार वकील कल्पलता भिडे यांचा केंद्रीय विधी व न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

विधी क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल आणि सामाजिक न्यायासाठीच्या त्यांच्या अथक प्रयत्नांसाठी हा सन्मान त्यांना प्रदान करण्यात आला.

या कॉन्फरन्सला राज्यभरातील नामवंत वकील, न्यायाधीश, विधी तज्ज्ञ आणि बार कौन्सिलचे पदाधिकारी उपस्थित होते.

भिडे यांनी आपल्या कारकीर्दीत अनेक आव्हानात्मक खटले हाताळले असून, त्यांच्या निर्भय वक्तृत्व आणि कायदेशीर ज्ञानामुळे त्या विधी क्षेत्रात एक आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखल्या जातात.

त्यांच्या कार्याचा गौरव करताना मेघवाल यांनी सांगितले की, “कल्पलता भिडे यांचे प्रामाणिक आणि निःस्वार्थी कार्य विधी क्षेत्रातील नव्या पिढीला प्रेरणा देणारे आहे. त्यांच्यासारख्या व्यक्तीमुळे कायदा आणि न्यायाची प्रतिष्ठा अजूनही अखंड आहे.”

कल्पलता भिडे यांनी याबद्दल प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, विधी क्षेत्रातील नैतिकता आणि सामाजिक जबाबदारीवर जोर दिला.

त्या म्हणाल्या, “न्याय ही फक्त कायद्याची अंमलबजावणी नाही, तर समाजातील प्रत्येक व्यक्तीला समान संधी आणि हक्क मिळवून देण्याची प्रक्रिया आहे.”

कार्यक्रमात बार कौन्सिलच्या विविध उपक्रमांचे सादरीकरण करण्यात आले तसेच विधी क्षेत्रातील नव्या आव्हानांवर चर्चा झाली.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*