दापोली : ४७ व्या राज्य कुमारी कबड्डी अजिंक्यपद क्रीडा स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्हा निवड चाचणी स्पर्धा नुकतीच संपन्न झाली होती. दुर्गामाता क्रीडा मंडळ कोळथरेच्या कुमारी संघाने या स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. विशेष म्हणजे कोळथरे येथील तीन कुमारी खेळाडूंची निवड जिल्हा संघात झाली आहे.
कु.सोनिया नाटेकर, कु. सानिका भाटकर, कु. संयोगीता वरवटकर या तीन कुमारी खेळाडूंची निवड जिल्हा संघात झाली आहे. या सर्व खेळाडूंना त्यांचे प्रशिक्षक सचिन चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
मला खात्री आहे की, आपल्या सर्वोत्तम खेळाच्या बळावर त्या रत्नागिरी जिल्हा संघाला राज्य अजिंक्यपद स्पर्धेत स्पृहणीय यश मिळवून देतील असा विश्वास कोळथरे येथील अगोमचे संचालक व भाजपा नेते दिपक महाजन यांनी व्यक्त केला.