रत्नागिरी – महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत जिल्ह्यातील उमेदवारांना इस्राईल येथे रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. इस्राईल मधील नॉन वॉर झोनमध्ये घरगुती सहाय्यक (HOME BASED CAREGIVER) या क्षेत्रात युवक युवतींना रोजगाराची संधी आहे.

याचा जिल्ह्यातील उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त इनुजा शेख यांनी केले आहे.

इंग्रजी भाषेचे सामान्य ज्ञान असणाऱ्या व २५ ते ४५ वर्षे वयोगटातील उमेदवार या योजनेमध्ये सहभागी होण्यास पात्र आहेत.

सोबतच उमेदवारांकडे काळजीवाहू (घरगुती सहाय्यक) सेवांसाठी निपुण/पारंगत, भारतातील नियामक प्राधिकरणाद्वारे मान्यताप्राप्त असलेले व किमान ९९० तासांचा कोर्स पूर्ण केलेले प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे (ऑन जॉब ट्रेनिंग सह).

भारतीय प्राधिकरणाद्वारे प्रदान केलेल्या मिडवाइफरी मधील प्रशिक्षण, संबंधित भारतीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली किवा नर्सिंग, फिजिओथेरपी, नर्स असिस्टंट मधील प्रशिक्षण पूर्ण असणे आवश्यक, तसेच जीडीए/एएनएम जीएनएम / बीएससी नर्सिंग/ पोस्ट बीएससी नर्सिंगची शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे.

इस्राईल मध्ये नोकरी मिळवण्यासाठी महाराष्ट्रातच निवड प्रक्रिया व नियुक्तीचे वाटप, आरोग्य तपासणी, व्हिजा आणि पासपोर्टसाठी संपूर्ण मार्गदर्शन व मदत विभागाकडून केली जाणार आहे. मेडिकल विमा, राहण्याची आणि जेवणाची सोयही असणार आहे.

पात्र उमेदवारांना रु.१ लाख ३१ हजार पर्यंत मासिक वेतन दिले जाईल.

जिल्ह्यातील जास्तीत जास्त इच्छुक पात्र उमेदवारांनी http://maharashtrainternational.com/job.aspx

या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन आपली माहिती भरावी अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकिय औदयोगिक प्रशिक्षण संस्था आवार, नाचणे रोड, पोस्ट एमआयडीसी, रत्नागिरी कार्यालयाशी संपर्क साधावा.