दापोली: उपजिल्हा रूग्णालयामध्ये दुरवरून येणारे रुग्णांच्या नातेवाईकांसाठी निवारा शेडची व्यवस्था करण्यात आली आहे.
दापोली शहरातील गरज लक्षात घेऊन जेसीआय दापोलीचे अध्यक्ष जेसी समीर कदम यांनी या लोकांना निवारा उपलब्ध व्हावा म्हणून विसावा शेडची उभारणी केली.
बैठक व्यवस्था व शेड उभारणी साठी जेसी सुयोग भागवत, दिलीप चव्हाण, अभिषेक खटावकर, मयुरेश शेठ, प्रसाद दाभोळे, आशिष अमृते, भूषण इसवलकर यांनी विशेष मेहनत घेतली.
या विसावा वाटिका उभारणीसाठी अभिजित जाधव, अमोद ओक, रुपेश मोहिते, राजू सुर्वे, प्रितेश मयेकर, अमित तांबे, अभिजित पुराणिक यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
ही व्यवस्था त्यांचे दापोली येथील मित्र सचिन बागाईतकर यांच्य स्मरणार्थ उभारण्यात आल्याची माहिती दापोली जेसीआय अध्यक्ष समीर कदम यांनी दिली.
ही विसावाशेड एका चांगल्या भावनेने केली आहे. तरी लोकांनी त्याची स्वच्छता व निगा राखावी असे आवाहन सुद्धा जेसी समीर कदम यांनी जेसीआय दापोली कडून केलं आहे.
सदर विसावा शेड उद्घाटन उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेश भागवत यांच्या हस्ते जेसीआय इंडिया झोन-११चे विभागीय अध्यक्ष मल्लिकार्जुन कुकनूर, संतोष ढेकणे, विभागीय उपाध्यक्ष गुरुदास मेथी, राजेश राजन यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
या अनोख्या व समाजोपयोगी उपक्रमाबाबत दापोलीकरांकडून जेसीआय दापोलीचे कौतुक करण्यात येत आहे.