आर्मी डे निमित्त सेवानिवृत्त सैनिकांचा जेसीआयकडून सन्मान

दापोली: 15 जानेवारी म्हणजे आर्मी दिवस. 15 जानेवारी 1949 आली स्थापन झालेल्या भारताच्या अधिकृत आर्मीचा आज 74 वा वर्धापन दिवस व त्याचे औचित्य साधून जेसीआय दापोली कडून आर्मी मधून सेवानिवृत्त झालेल्या सैनिका॑चा सन्मान करण्यात आला. यावेळी श्री विजय महाडिक शिवाजीनगर दापोली व दीपक विचारे काळकाई कोंड दापोली यांचा सन्मान करण्यात आला. श्री विजय महाडिक यांनी 1971 सालच्या युद्धाचा आपला अनुभव सांगितला तर 1999 च्या कारगिल युद्ध चा अनुभव श्री दिपक विचारे यांनी मनातून मोकळा केला. वीस वर्षाच्या प्रदिर्घ रिटायरमेंट नंतर आज आर्मी दिवसानिमित्त माजी सैनिकाची कोणीतरी दखल घेतली व सन्मान केला म्हणून दोन्ही सैनिक खूप भारावून गेले व JCI दापोलीचे मनोमन आभार मानले. यावेळी दापोली कडून अध्यक्ष श्री अतुल गोंदकर माजी अध्यक्ष कुणाल मंडलिक व समीर कदम सेक्रेटरी मयुरेश शेठ ऋत्विक बापट भूषण इस्वलकर ऋषिकेश शेठ व खजिनदार प्रसाद दाभोळे आधी जेसी सदस्य उपस्थित होते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*