दापोली:- जेसीआय दापोली या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या वतीने शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या दापोलीतील शिक्षणसंस्था चालकांचा सन्मान करण्यात आला.
यामध्ये डिस्टिंक्टिव्ह एज्यूकेशन सोसायटी चे संस्थापक संदीप राजपुरे, ज्ञानदीप एज्युकेशन संस्थेचे सचिव सुजय मेहता , सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका रितू मेहता व सिद्धी एज्यूकेशन संस्थेचे संस्थापक समीर गुजराथी, सरस्वती इंग्लिश मिडीयम स्कूलच्या मुख्याध्यापिका सारिका गुजराथी यांचा सन्मान करण्यात आला.
शिक्षण क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी करण्यात येणाऱ्या व्यक्तींचा जेसीआय इंडियाकडून सदर कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी जेसीआय दापोलीचे अध्यक्ष जेसी कुणाल मंडलिक, जेसी.आशिष अमृते, जेसी. अभिषेक खटावकर, जेसी. रित्विक बापट, जेसी. दिलीप चव्हाण, जेसी. मुश्ताक खान, जेसी नितीश राऊत उपस्थित होते. यावेळी सर्व सन्माननीय व्यक्तींनी जेसीआय दापोलीच्या या उपक्रमाचे कौतुक करत आभार मानले.