दापोली – दिनांक ९ जानेवारी २०२२ रोजी पार पडलेल्या जेसीआय दापोलीच्या सातव्या पदग्रहण सोहळ्यावेळी जेसी अतुल गोंदकर यांनी सातवे अध्यक्ष म्हणून शपथ घेतली. मावळते अध्यक्ष जेसी कुणाल मंडलिक यांनी त्यांना शपथ दिली.

दापोली येथील मँगो इन या ठिकाणी हा सोहळा पार पडला.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून विधी तज्ज्ञ एडवोकेट सुधीर बुटाला, केदार साठे तसेच झोन ११ जेसीआय अध्यक्ष जेसी ईशान उसापकर, उपाध्यक्ष शाबा गौन्स उपस्थित होते.


जेसी अतुल गोंदकर गेल्या अनेक दिवसांपासून समाजकार्य करत आहेत. जेसीआय संस्थेच्या माध्यमातून तालुक्यामध्ये विविध उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग आहे. सन 2021 मध्ये त्यांनी जेसीआय दापोलीचा सेक्रेटरी म्हणून पदभार सांभाळला होता. या वर्षी म्हणजेच 2022 मध्ये त्यांना अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाली.