मुंबई :- देशात हळूहळू कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी सुधारीत मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
येत्या 14 फेब्रुवारीपासून नवी नियमावली जारी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, प्रवास करण्यापूर्वी प्रवाशांनी 72 तास आधी कोरोना चाचणी निगेटीव्ह आल्याचे प्रमाणपत्र अपलोड करणे गरजेचे आहे. तसेच लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र देखील गरजेचे असणार आहे. तसेच आता 7 दिवस होम क्वारंटाईन होण्याची आवश्यकता नसणार आहे.प्रवाशांना भारताचा दौरा करण्यापूर्वी त्यांचा मागील 14 दिवसांचा प्रवास व भारतातील पूर्ण प्रवासाबद्दल माहिती देणे गरजेचे आहे. सरकारने भारतात आल्यावर 14 दिवसांचे स्व-निरीक्षण करण्याची शिफारस केली आहे. आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, भारतात आल्यानंतर आठव्या दिवशी RT-PCR चाचणी घेण्याची आणि तो रिपोर्ट अपलोड करण्याची आता गरज नसेल.