पुणे:-महाराष्ट्र कोरोनाच्या कचाट्यातून सुटत असताना महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्थेपुढे एक मोठे आव्हान उभे राहिले आहे. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यामध्ये बेलसर गावात झिका विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. महाराष्ट्रात झिका विषाणूचा पहिला रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे परिसरातील पाच किलोमीटर मधील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्या स्थितीला हवामान हवामान बदलामुळे डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया त्याचबरोबर इतर साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. बेलसर मध्ये मागील एक ते दिड महिन्यापासून डेंग्यू चिकनगुनिया आणि इतर साथीच्या रोगांनी थैमान घातले होते. त्याच अनुषंगाने एनआयव्ही पुणे बेलसर (ता.पुरंदर) मधील काही 51 नमुने गोळा करून ते तपासणीसाठी घेतले होते. त्यामध्ये प्रमुख्याने झिका विषाणूचा एक रुग्ण असल्याचे जाणवून आले आणि 25 चिकनगुनिया, 3 डेग्यूचे रुग्ण आढळून आले.