इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसने रशियाला तातडीने युक्रेन वरील हल्ले रोखण्याचे आदेश दिले आहेत. भारतानेही रशियाला विरोध केला आहे. विशेष म्हणजे भारताने आतापर्यंत संयुक्त राष्ट्रात तटस्थ भूमिका घेतली होती. मात्र आंतरराष्ट्रीय न्यायालयात 13 न्यायाधीशांनी रशियाच्या विरोधात मतदान केले. यात भारतीय न्यायाधीश दलवीर भंडारी यांनी रशियाचे विरोधात मतदान केले आहे.