इंडियन ऑइलने व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात १०० रुपयांनी कपात केली

इंडियन ऑइलने नवीन वर्षात लोकांना मोठी भेट दिली आहे. इंडियन ऑइलने व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात १०० रुपयांनी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे.मात्र, घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. याआधी डिसेंबर महिन्यात व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमती वाढवण्यात आल्या होत्या. डिसेंबरमध्ये एलपीजी सिलेंडरच्या दरात १०० रुपयांनी वाढ करण्यात आली होती. मात्र, त्यावेळी घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही ही जनतेसाठी दिलासादायक बाब होती. व्यावसायिक सिलेंडरच्या दरात कपात झाल्याने रेस्टॉरंट मालकांना दिलासा मिळाला आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*