पुणे : शेतीवर कीटकनाशकांची फवारणी, आपत्ती काळात मदतीसाठी, संवेदनशील भागात देखरेखीसाठी, चित्रपटांच्या चित्रीकरणामध्ये वापरले जाणारे ड्रोन तंत्रज्ञान आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शिकता येणार आहे. विद्यापीठामध्ये ड्रोनसंबंधित प्रमाणपत्र, पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम उपलब्ध होणार असून, ड्रोनसंबंधित अभ्यासक्रम सुरू करणारे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पहिले राज्य विद्यापीठ ठरले आहे.