सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांचा पॉझिटिव्हीटी रेट ९.०६ टक्के झाला असून ऑक्सिजन बेड्स व्यापलेची टक्केवारी ५५.२० टक्के आहे. राज्य शासनाच्या निर्देशानुसार सद्यस्थितीत सिंधुदुर्ग जिल्हा कोरोना अनलॉकच्या स्तर ३ मध्ये समाविष्ट आहे. त्यामुळे जिल्ह्याकरिता येत्या २१ जून रोजी सकाळी ७ वाजल्यापासून २८ जून रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत सुधारित आदेशांनुसार निर्बंधांमध्ये काही सवलती लागू केल्याचे आदेश जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी दिले आहेत. या आदेशानुसार अत्यावश्यक सेवेशी संबंधित सर्व दुकाने दररोज सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरू राहतील. अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरू राहतील. मॉल्स, सिनेमा हॉल (मल्टी प्लेक्स व सिंगल स्क्रीनसह), नाट्यगृह बंद राहतील. रेस्टॉरंट्स सोमवार ते शुक्रवार सायंकाळी ४ वाजेपर्यंत ५० टक्के आसनक्षमतेुनसार डायनिंग सुरू राहील. सायंकाळी ४ नंतर पार्सल सेवा चालू राहील. शनिवार आणि रविवार फक्त पार्सल व होम डिलिव्हरी सुविधा चालू राहील. सार्वजनिक ठिकाणे / खुली मैदाने / फिरणे / सायकलिंग – दररोज सकाळी ५ ते सकाळी ९ वाजेपर्यंत. खासगी आस्थापना / कार्यालये सोमवार ते शुक्रवार सायंकाळी ४ वाजेपर्यंत. खासगी बॅंका, विमा, औषध कंपनी, सूक्ष्म वित्तसंस्था व गैरबॅंकिंग वित्त संस्था नियमितपणे कार्यालयीन वेळेपर्यंत सुरू राहतील. शासकीय कार्यालयांसहित (सूट असलेली खासगी कार्यालये) ५० टक्के उपस्थितीसह सुरू राहतील. करोनाविषयक कामे करणाऱ्या आस्थापना, मान्सूनपूर्व कामांशी संबंधित यंत्रणा / कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरू राहतील.
सिंधुदुर्ग जिल्हा कोरोना अनलॉकच्या स्तर ३ मध्ये समाविष्ट, अनेक सवलती

Byमाय कोकण प्रतिनिधी
Jun 19, 2021