
रत्नागिरी : दुसऱ्या लाटेत कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वाधिक होणाऱ्या जिल्ह्यात रत्नागिरी राज्यात पाचवा आहे. ग्रामीण भागात बाधितांची संख्या वाढत असल्याने त्यावर मात करण्यासाठी गेले काही दिवस प्रशासनाकडून पावले उचलली जात आहेत. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, आजच्या घडीला जिल्ह्यातील १ हजार ५३४ पैकी ९७३ गावांनी कोरोनाला वेशीबाहेर करण्यात यश मिळवले. २५ पेक्षा अधिक बाधित असलेली गावे २९ आहेत. मंडणगड तालुका कोरोना मुक्तीच्या दिशेने वाटचाल करत आहे.

Leave a Reply