देशात करोनाचा कहर, २४ तासांत सव्वा लाखांहून अधिक रुग्णांची नोंद; महाराष्ट्रात ‘महा’संकट


मुंबई: करोनाला प्रतिबंधित करण्यासाठी एकीकडे प्रयत्न सुरु असताना पुन्हा एकदा दैनंदिन रुग्णसंख्येने एक लाखांचा टप्पा ओलांडला आहे. आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णवाढ नोंद करत गेल्या २४ तासात देशात सव्वा लाखांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. गेल्या २४ तासांत देशात १ लाख २६ हजार ७८९ नवे करोना रुग्ण आढळले आहेत. तर ६८५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ५९ हजार २५८ जण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी पाठवण्यात आलं. यासोबतच देशातील एकूण करोनाबाधित रुग्णसंख्या १ कोटी २९ लाख २८ हजार ५७४ वर पोहोचली आहे. करोनाचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*