रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असली तरी कोरोनावर मात करणाऱ्यांचीही संख्या वाढत आहे. जिल्ह्यात काल नवे ६६२ करोनाबाधित आढळले, तर त्याहून अधिक म्हणजे ७९६ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने कोरोनामुक्तांची एकूण संख्या १९ हजार १९० झाली आहे. कोरोनामुक्तांची ही टक्केवारी ७४.०८ टक्के झाली आहे.