रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांत कडक लाँगडाऊन असूनसुद्धा कोरोना बाधितांची संख्या कमी होताना दिसत नाही. कोरोना बाधितांच्या दिवसेंदिवस वाढ ही प्रशासनाची डोकेदुखी ठरत आहे. आज आठ दिवसांनी कोरोना बाधितांची संख्या काहीशी कमी झाली आहे. ५००च्या बाहेर असणारी बाधितांची संख्या आज मात्र कमी ४२६ इतकी झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे

मंडणगड — १७
दापोली — ७३
खेड — ३२
गुहागर — ३०
चिपळूण — ८६
संगमेश्वर — २५
रत्नागिरी — १२८
लांजा — ६
राजापूर — २९