फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात अनेकांना आता उन्हाची झळ सोसावी लागत आहे, कारण राज्यातल्या तापमानात वाढ झाली आहे.कोरडे हवामान आणि निरभ्र आकाशामुळे स्थितीमुळे तापमानात वाढ झाली असल्याचा अहवाल पुण्यातील हवामान विभागाने अंदाज व्यक्त केला आहे. तसेच पुढील तीन ते चार तापमानातील वाढ अशीचं राहील अशी शक्यता देखील त्यांनी व्यक्त केली आहे. रात्रीचं तापमान देखील वाढल्याने रात्रीची थंडी देखील गायब झाल्याचं पाहायला मिळत आहे. मध्य महाराष्ट्रासह अनेक जिल्ह्यात कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत 2 अंशांनी वाढ झाली आहे. त्याचबरोबर अनेक भागात तापमान 35 अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याचं पाहायला मिळतंय.