रत्नागिरी : गेल्या 24 तासात प्राप्त अहवालांमध्ये 43 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान दापोलीमध्ये एकही पॉझिटिव्ह रग्ण साडलेला नाहीयेे. ही दाापोलीसाठी दिलासादायक गोष्ट आहे.
सध्या जिल्ह्यामध्ये एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1661 झाली आहे. दरम्यान 48 रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1102 झाली आहे.
आज बरे झालेल्यांमध्ये जिल्हा कोव्हीड रुग्णालय 3, कोव्हीड केअर सेंटर केकेव्ही, दापोली 3, उपजिल्हा रुग्णालय कामथे 3, कोव्हीड केअर सेंटर समाजकल्याण 7, कोव्हीड केअर सेंटर घरडा, खेड 19, आणि 13 कोव्हीड केअर सेंटर पेंढांबे, चिपळूण मधील आहेत.
पॉझिटिव्ह रुग्णांचे विवरण खालील प्रमाणे
जिल्हा कोव्हीड रुग्णालय, रत्नागिरी – 16 रुग्ण
उपजिल्हा रुग्णालय, कामथे – 20 रुग्ण
कळबणी, खेड – 2 रुग्ण
गुहागर – 5 रुग्ण
मुरडव, संगमेश्वर येथील एका 45 वर्षीय रुग्णाचा सर्पदंश झाल्याने मृत्यू झाला. सदर रुग्णाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. पेठकिल्ला, रत्नागिरी येथील 40 वर्षीय कोरोना रुग्ण तसेच मिरकरवाडा, रत्नागिरी येथील 40 वर्षीय महिला कोरोना रुग्णाचा उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच कालुस्ते, चिपळूण येथील 80 वर्षीय कोरोना उपचार दरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची संख्या आता 57 झाली आहे.
तालुकानिहाय मृतांचा आकडेवारी
रत्नागिरी – 14
खेड – 6
गुहागर – 2
दापोली – 11
चिपळूण – 10
संगमेश्वर – 7
लांजा – 2
राजापूर – 4
मंडणगड – 1
सायंकाळची स्थिती खालीलप्रमाणे
एकूण पॉझिटिव्ह – 1661
बरे झालेले – 1102
मृत्यू – 57
एकूण ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह – 502
ॲक्टीव्ह कन्टेंनमेन्ट झोन (२७ जुलै २०२० पर्यंत )
जिल्ह्यात सध्या 198 ॲक्टीव्ह कन्टेन्मेंट झोन असून रत्नागिरी तालुक्यात 25 गावांमध्ये, दापोली मध्ये 11 गावांमध्ये, खेड मध्ये 60 गावांमध्ये, लांजा तालुक्यात 7, चिपळूण तालुक्यात 82 गावांमध्ये, मंडणगड तालुक्यात 1, गुहागर तालुक्यात 10 आणि राजापूर तालुक्यात 2 गावांमध्ये कंटेन्मेंट झोन आहेत.