दापोलीत जेसीआयने केला परिचारिकांचा सन्मान

दापोली:-कोविडच्या या संकटात घर, कुटुंबाचे बंध बाजूला ठेवून, जीवाची पर्वा न करता रुग्णसेवेसाठी झटणाऱ्या हजारो परिचारिकांना नर्सेस- सिस्टर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या परिचारिका -रुग्णसेविका कोविड योद्ध्या आहेत. त्या कोविड-१९ च्या पहिल्या लाटेपासून ते आतापर्यंत आघाडीवर राहून, रुग्णसेवेत मेहनत घेत आहेत. आपले घर, कुटुंब यांची जबाबदारी सांभाळत, त्यांनी रुग्णसेवेलाच प्रथम प्राधान्य दिले आहे. आजही त्या डॉक्टर्स आणि तज्ज्ञांच्या खांद्याला-खांदा लावून काम करत आहेत. त्यामुळे हजारो रुग्णांना विषाणूशी लढण्याचे बळ मिळाले आहे. कित्येकांना बरे होऊन आपल्या कुटुंबात परतता आले आहे. जागतिक परिचारिका दिनाचे औचित्य साधून जेसीआय दापोली या संस्थेमार्फत उपजिल्हा रुग्णालयातील परिचरिकांचा सन्मान करण्यात आला. कोव्हीड काळामध्ये अत्यंत मेहनतीने कार्यरत असणाऱ्या व धाडसाने व मायेने रुग्णांना बर करण्यात डॉक्टरांच्या साथीने मोलाचे योगदान असणाऱ्या अनघा घाग, सेजल मळेकर, साक्षी हांडे, स्नेहल गोपने, ममता कांबळे, दिपिका नांदगावकर, गायत्री भाटकर, दर्शना शिंगाडा, मालिनी वसावे, प्रिया वंडकर, सोनी पवार, जोगेश्वरी वळवी, अर्चना वसावे, निकिता घुगरे, दिपाली पवार, स्वप्नाली दाभोलकर, वर्षा दवंडे, अक्षता मोगरे, प्रियांका बिरवटकर, शितल कडू, दिव्यांक मस्के, अस्मिता जाधव या महिला योध्यानचा सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. आमच्या कार्याची दखल घेऊन जेसीआय दापोली या संस्थेने आमचा सन्मान केला याबद्दल आम्ही त्यांचे ऋणी आहोत असे मत परिचरिकांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमास जेसीआय दापोलीचे अध्यक्ष जेसी कुणाल मंडलिक, जेसी समीर कदम, जेसी अतुल गोंदकर, जेसी मयूर मंडलिक, जेसी मयुरेश शेठ, जेसी प्रसाद दाभोळे, जेसी सिद्धेश शिगवण व परिचारिका उपस्थित होत्या. यावेळी मोंजिनीस केक शॉपच्या वतीने त्यांना केक देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*