घटती रुग्णसंख्या आणि कोरोनाची तिसरी लाट ओसरत असल्याने मार्च महिन्यात महाराष्ट्र निर्बंधमुक्त होण्याचे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी दिले.

मात्र मास्क लावणे अनिवार्य आणि फिजिकल डिस्टन्सिंग कायम राहणार आहे, असे ते म्हणाले.

कोरोना लाटेचा प्रभाव कमी होत असल्याने केंद्र सरकारनेही सर्वच राज्यांना निर्बंधांचा फेरआढावा घेण्याचे सांगितले. पॉझिटिव्हिटी रेट आणि रुग्णसंख्या पाहून निर्बंध हटवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

त्या पार्श्वभूमीवर बोलताना आरोग्यमंत्री म्हणाले, कोरोना कृती दलही निर्बंध हटवण्याबाबत अनुकूल आहे, परंतु निर्बंध पूर्णपणे हटवण्याबाबत मुख्यमंत्रीच अंतिम निर्णय घेतील, असे टोपे यांनी स्पष्ट केेले.

राज्यातील लसीकरण राहिलेल्या नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे. लसीकरण केल्यास चौथ्या लाटेचा धोका नाही, असे टोपे म्हणाले.