राज्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) 29 जानेवारी, 30 जानेवारी, 5 फेब्रुवारी आणि 12 फेब्रुवारीला होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहे.

86 उमेदवारांनी उत्तरतालिकेसंदर्भात रिट याचिका न्यायालयात दाखल केली होती. त्या प्रकरणी न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.

या संदर्भात अंतिम न्यायनिर्णय येईपर्यंत परीक्षेच्या आयोजनासंदर्भातील सर्व प्रक्रिया स्थगित करण्यात येत असल्याचेही आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

कोरोना काळात आयोगाकडून घेण्यात येणार्‍या अनेक परीक्षा पुढे ढकलण्यात येत असल्याने याचा प्रचंड मनस्ताप विद्यार्थ्यांना सहन करावा लागतोय