रत्नागिरी : कोरोना × हेल्पिंग hands ग्रुप रत्नागिरी यांच्या माध्यमातून ईदनिमित रक्तदान शिबिराचे रत्नागिरी जिल्हा रुग्णालय येथे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद लाभला होता. या शिबिरामध्ये तब्बल १०१ रक्तदात्यांनी रक्तदान करून कोरोनाच्या या संकट काळात आपले योगदान दिले आहे. आयोजक जकी खान यांच्या वतीने सर्व रक्तदात्यांचे आभार मानण्यात आले आणि भविष्यात संकट समयी आपण कोणतीही जबाबदारी पार पाडू शकतो असे त्यांनी आश्वासित केले आहे. हे शिबिर यशस्वी पार पाडण्यासाठी आयोजक जकी खान सोबत तसवर खान, जुनेद खान, तन्वीर जमादार, मुजाहीद जमादार, रवी घोसाळकर, समीर काद्री, आतर बोरकर, फरहान मुल्ला, नौमान म्हसकर