खेड : खेड पोलीस ठाणे हद्दीमधील मुंबई-गोवा महामार्गावरील रेल्वेस्टेशन समोरून गुटखा विक्रीस घेऊन जाणाऱ्या दोघांना खेड पोलीसांनी अटक केली आहे.

या गुटख्याच्या वाहतुकीबद्दल माहिती मिळाल्यानंतर खेड पोलीस निरीक्षक व स्टाफ यांनी मुंबई-गोवा महामार्गावरील रेल्वेस्टेशन समोर नाकाबंदी केली.

या नाकाबंदी दरम्याने आज दिनांक 05/11/2023 रोजी 02.30 वा. च्या सुमारास एका संशयित Ashok Leyland-Bada Dost या वाहनाला (क्रमांक एमएच-46 बीयु- 8164) खेड पोलीसांमार्फत थांबवण्यात आले व त्यास चेक केले असता सदर वाहनात गुटखा हा प्रतिबंधीत अन्नपदार्थ मिळून आलेला आहे..

या कारवाई मध्ये,

विमल पान मसाला व V-1 तंबाखू असा मिळून ₹ 8,80,200 /- किमतीचा व “Ashok Leyland Bada Dost” हे वाहन ₹9,25,000/- असे मिळून एकूण 18,05,200 /- चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

तसेच या वाहनावरील चालक 1) प्रेमल शंकर मोकळ वय 35 वर्षे, रा. वाशीनाका, घर क्रं. 104, पेण, जि. टायगड व 2) जगदिश हरीश्चंद्र म्हात्रे वय 33 वर्षे, रा. कांदळेपाडा, पेण, जि. रायगड या दोघांना ताब्यात घेण्यात आलेले आहे.

या “प्रतिबंधीत गुटखा ” हा, वरील नमूद आटोपी हे विक्री करिता घेऊन जात असताना मिळून आल्याने त्यांच्या विरुद्ध खेड पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि नंबर 340 / 2023 भा. द. वि. संहिता कलम 328, 188, 272, 273, 34 व अन्न सुरक्षा अधिनियम 2006 चे कलम 26 (1), 26 ( 2 ) 26 (21), 26 (2 IV), 26 (3d), 27 (39), 30 (23) अन्वये गुन्हा दाखल करून गुन्ह्याचा अधिक तपास सुरू आहे.

तसंच ही कारवाई पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड व उपविभागीय पोलीस अधिकारी खेड राजेद्र मुणगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी खेड पोलीस ठाणे नितीन भोयर व अंमलदार यांनी केली आहे.

“गुटखा विक्री, वाहतूक किंवा बाळगण्याच्या सर्व बेकायदेशीर उद्योगांना मुळापासून नष्ट करण्याकरिता रत्नागिरी पोलीसांमार्फत कठोर कारवाई करण्यात येणार”.

धनंजय कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, रत्नागिरी