चिपळूण– ‘ब्रेक दी चेन’ मोहिमेअंतर्गत जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी तसेच परजिल्ह्यातून येण्यासाठी ई -पास बंधनकारक करण्यात आले आहेत. कुंभार्ली घाटातून जिल्ह्यात प्रवेश करणार्यांची कडक तपासणी पोलिसांकडून सुरू आहे. ई-पास मिळत नाही अशा व्यक्तींना परत पाठवले जाते. कोणी हुज्जत केली तर वाहनाचे फोटो काढून अॅपद्वारे दंडात्मक कारवाई केली जाते. पास नसलेल्या व्यक्तींना दंड आकारला जात आहे. अनेकांना परतही पाठविले जात आहे.
कुंभार्ली घाटातील रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेवर अलोरे-शिरगाव पोलिसांचे चेकपोस्ट आहे. त्या ठिकाणी अलोरे-शिरगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी, होमगार्डस् आणि शिक्षकांचा खडा पहारा आहे.