आज गोपीनाथ मुंडे असते तर ओबीसी आरक्षण रद्द करण्याची हिंमत झाली नसती : फडणवीस

मुंबई : भाजपचे दिवंगत नेते आणि महाराष्ट्रात लोकनेते म्हणून ओळख असलेले गोपीनाथ मुंडे यांच्या सातव्या पुण्यतिथीनिमित्त डाक पाकीटचं अनावरण करण्यात आलं. या निमित्त गोपीनाथ गडावरुन ऑनलाईन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद, देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेते ऑनलाईन माध्यमातून या कार्यक्रमात सहभागी झाले. या कार्यक्रमात बोलताना फडणवीस यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणी जागवल्या. त्याचबरोबर ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द झाल्याच्या मुद्द्यावरुनही त्यांनी ठाकरे सरकारवर टीका केलीय. महाविकास आघाडी सरकारमुळे ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द झालं. आज लोकनेते, जननायक गोपीनाथ मुंडे असते तर ओबीसी आरक्षण रद्द करण्याची हिंमत या सरकारची झाली नसती, अशा शब्दात फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर हल्ला चढवलाय.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*