दापोली : येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे निवृत्त ग्रंथपाल आणि ज्येष्ठ साहित्यिक प्रा. श्रीरंग रोडगे ह्यांच्यावरील ‘हृदरंग’ या गौरव ग्रंथाचे प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण विभागाच्या सभागृहात झाले.

या समारंभाला कुलगुरु डॉ. संजय भावे प्रमुख पाहुणे म्हणून, तर विद्यापीठातून निवृत्त झालेले भाषा विषयाचे ज्येष्ठ प्राध्यापक अशोक देशमुख अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. लीला रोडगे आणि प्रा. रोडगे व्यासपीठावर उपस्थित होते.

याप्रसंगी, कुलगुरु डॉ. भावे ह्यांच्या हस्ते रोडगे दाम्पत्याचा शाल, श्रीफळ,पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.

कुलगुरु डॉ. भावे आणि प्रा. देशमुख ह्यांच्या व्यतिरीक्त समारंभामध्ये उपस्थित प्रा. बाळासाहेब पाठक, सिकंदर नायकवाडे आणि डॉ. अशोक निर्बाण ह्यांनी, तसेच व्हिडिओ सन्देशाद्वारे माजी कुलगुरु डॉ. श्रीरंग कद्रेकर, माजी विभागप्रमुख डॉ. प्रभाकर वराडे, माजी सहा. कुलसचिव सत्यवान मोटे, माजी सहा. नियंत्रक डॉ. दशरथ भोसले, पुण्यातील यशदाचे प्रसिद्धी अधिकारी डॉ. बबन जोगदंड, प्रा. योगिराज वाघमारे सोलपूर, रमाई मासिकाच्या संपादक डॉ रेखा मेश्राम, कोल्हापूरचे कला व्यावसायिक सचिन मुळे ह्यांनी गौरव ग्रंथ आणि प्रा. श्रीरंग रोडगे ह्यांच्याविषयी मनोगत व्यक्त केले.

विस्तार शिक्षण विभागातील डॉ. प्रवीण झगडे ह्यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर प्रा. मिथुन येलवे ह्यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन केले.

विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. प्रमोद सावंत, विभागप्रमुख डॉ. जगदीश कदम, रमेश कुणकेरकर, सचिन पाठक, डॉ. विठ्ठल नाईक, निवृत्त अधिकारी व कर्मचारी, ज्येष्ठ कवी प्रा. कैलास गांधी , विद्यार्थी आणि प्रा.रोडगे ह्यांचे चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते.