भगवतीनगर शाळेत HPV लसीकरण उपक्रम: पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

निवेंडी : मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने जिल्हा परिषद शाळा, निवेंडी खालची भगवतीनगर येथे HPV लसीकरण उपक्रम यशस्वीपणे पार पडला. या कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थिनींना गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण देणारी HPV लस देण्यात आली.

या उपक्रमाला पालकांनी उत्स्फूर्त सहभाग दर्शवत लसीकरणाबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी लसीकरणाचे महत्त्व, सुरक्षितता आणि त्याचे भविष्यातील आरोग्य फायदे याबाबत सविस्तर माहिती पालकांना दिली.

कार्यक्रमात मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल पणकुटे, आरोग्य सहाय्यक डॉ. परशुराम निवेंडकर, आरोग्य सहाय्यिका सीमा पाडवी, CHO अक्षता शिर्षेकर, आरोग्य सेविका दीपा गावडे, आरोग्य सेवक सुरेश अंबुरे, आशा आणि अंगणवाडी सेविका यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक उपस्थित होते. सर्वांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*