राज्यातील पोलिसांना राहण्यासाठी पुरेशा जागेची गरज लक्षात घेवून येत्या काळात एक लाख निवास स्थाने बांधण्याचे लक्ष्य असून पोलिस स्टेशनच्या अत्याधुनिक इमारती बांधण्याचे कामही हाती घेणयात आली असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री दिपील वळसे पाटील यांनी मंगळवारी दिली.राज्यात १७२ पोलिस स्टेशन भाड्याच्या जागेत आहेत. २३८ पोलिस स्टेशनच्या इमारती जिर्ण झाल्या आहेत. त्या तातडीने अत्याधुनिक सुविधांसह बांधण्याची गरज असल्याचे गृहमंत्री म्हमआले. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करताना ७५ पोलिस स्टेशनच्या इमारतीच्या बांधकाम सुरू केल्याची माहितीही त्यांनी दिली. पोलिसांच्या घरांचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी राज्यांमध्ये एक लाख निवास स्थाने बांधण्याचे उद्दिष्ट असल्याचे ते म्हणाले.
राज्यांमध्ये ३६.५६ टक्के पोलिस निवास स्थाने उपलब्ध आहेत. किमान ६० टक्के गरज लक्षात घेऊन एक लाख घरांचे उद्दिष्ट निश्चित केले असल्याचे ते म्हणाले. जी निवास स्थाने उपलब्ध आहेत, त्यांची स्थिती चांगली नाही. त्याच्या दुरुस्तीची गरज आहे. त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची मागणी गृहमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली.