रत्नागिरी दि. 27: राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सिंधुदूर्ग जिल्हयाचे पालकमंत्री उदय सामंत हे रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

शुक्रवार 28 मे 2021 रोजी सकाळी 05.25 वाजता दादर मुंबई येथून दादर मडगांव जनशताब्दी स्पेशल एक्सप्रेसने रत्नागिरीकडे प्रयाण. सकाळी 10.25 वा.दादर मडगांव जनशताब्धी स्पेशल एक्सप्रेसने रत्नागिरी रेल्वे स्थानक येथे आगमन व मोटारीने शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी कडे प्रयाण.
सकाळी 10.35 वाजता शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथे आगमन व राखीव.
दुपारी 12.00 वाजता रत्नागिरी जिल्हा कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर मेडीकल ऑक्सीजन पुरवठा, प्रतिबंधात्मक उपाययोजना, कडक निर्बंध व लसीकरणाबाबत आढावा बैठक.(स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी). दुपारी 01.00 वाजता तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीबाबत तालुकानिहाय आढावा बैठक. (स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी ). दुपारी 02.00 वाजता मान्सून पूर्वतयारी आढावा बैठक.(स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी). दुपारी 03.00 ते 04.00 वाजता राखीव.दुपारी 04.00 वाजता पत्रकार परिषद. (स्थळ : जिल्हा परिषद, रत्नागिरी) 05.00 वाजता पालकमंत्री रत्नागिरी जिल्हा यांच्या उपस्थितीत जिल्हा खनिकर्म योजना व आरोग्य विभागाच्या माध्यमातून पुरविण्यात आलेल्या रुग्णवाहिकेच्या ऑनलाईन लोकार्पण सोहळयास उपस्थिती. (स्थळ : जिल्हा परिषद, रत्नागिरी).
सायंकाळी सोईनुसार मोटारीने शासकीय विश्रामगृह, रत्नागिरीकडे प्रयाण. रात्रौ सोईनुसार शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथे आगमन व राखीव.

शनिवार 29 मे 2021 रोजी सकाळी 08.00 वाजता रत्नागिरी येथून मोटारीने ओरोस सिंधुदूर्गकडे प्रयाण.