उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचा दौरा कार्यक्रम

रत्नागिरी दि. 12: राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सिंधुदूर्ग जिल्हयाचे पालकमंत्री उदय सामंत हे रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. गुरुवार 13 मे 2021 रोजी सकाळी 09.00 वाजता जुहू विमानतळ येथे आगमन व हेलिकॉप्टरने पालकमंत्री रत्नागिरी यांच्यासमवेत रत्नागिरीकडे प्रयाण. सकाळी 10.15 वाजता पालकमंत्री रत्नागिरी यांच्यासमवेत रत्नागिरी विमानतळ येथे आगमन व मोटारीने महिला रुग्णालय, रत्नागिरीकडे प्रयाण. सकाळी 10.30 वाजता पालकमंत्री रत्नागिरी यांच्यासमवेत शासकीय महिला रुग्णालय, पाहणीस उपस्थिती. सकाळी 11.00 वाजता पालकमंत्री रत्नागिरी यांच्यासमवेत ऑक्सीजन प्लँटची पाहणीस उपस्थिती.

सकाळी 11.15 वाजता पालकमंत्री रत्नागिरी यांच्यासमवेत रत्नागिरी जिल्हयामध्ये खनिकर्म योजनेच्या माध्यमातून पुरविण्यात आलेल्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण कार्यक्रमास उपस्थिती.(स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी). सकाळी 11.30 वाजता पालकमंत्री रत्नागिरी यांच्यासमवेत रत्नागिरी जिल्हयातील कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना,कडक निर्बंध व लसीकरणाबाबत आढावा बैठक उपस्थिती. (स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी).
दुपारी 12.30 वाजता पालकमंत्री रत्नागिरी यांच्यासमवेत कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर मेडीकल ऑक्सीजन पुरवठा, वैद्यकीय अधिकारी व पॅरामेडीकल स्टॉफ (आरोग्य आस्थापना) आढावा तसेच माझी रत्नागिरी माझी जबाबदारी आढावा बैठक उपस्थिती. (स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी).
दुपारी 01.00 वाजता पालकमंत्री रत्नागिरी यांच्यासमवेत रत्नागिरी जिल्हयातील खरीप lहंगामपूर्व आढावा 2021 बैठकीस उपस्थिती.(स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी). दुपारी 02.00 वाजता पत्रकार परिषद (स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी).
दुपारी 02.30 ते 03.45 वाजता राखीव.
दुपारी 03.45 वाजता शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथून रत्नागिरी विमानतळ कडे प्रयाण. दुपारी 04.00 वाजता रत्नागिरी विमानतळ, ता.जि. रत्नागिरी येथे आगमन व हॅलिकॉप्टरने जुहू विमानतळ, मुंबईकडे प्रयाण

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*