रत्नागिरी शहरात आता हेल्मेटसक्ती नाही

रत्नागिरी : जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी आदेश काढून रत्नागिरी शहरवासियांना हेल्मेटसक्तीच्या जाचातून सुटका केली आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या सूचनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे.

वाहतूक नियमांबाबत प्रथम जनजागृती करण्यासाठी व्यापक मोहीम राबविण्यात येईल व तिचा अहवाल परिवहन आयुक्तांना सादर केला जाईल असे या आदेशात म्हटले आहे.

पुणे येथील जिल्हाधिकारी यांनी घेतलेल्या निर्णयानुसार सदरचे आदेश जिल्हाधिकारी रत्नागिरी यांनी परित केले असून आता या आदेशामुळे रत्नागिरीतील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

गेल्या आठवड्यात रत्नागिरीतील नागरिकांनी आणि पत्रकारांनी हेल्मेटसक्ती रद्द करण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी प्रशासनाला सूचना दिल्या होत्या . आता या सूचनेनुसार उद्यापासून रत्नागिरीकरांची हेल्मेट सक्तीतून मुक्तता होणार आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*