रत्नागिरी : पुणे येथे ज्याप्रमाणे हेल्मेट सक्ती न करता त्याच्या वापराबाबत प्रबोधन केले जात आहे, त्याच धर्तीवर रत्नागिरी शहरात कार्यवाही अधिकाऱ्यांनी करावी असे स्पष्ट आदेश राज्याचे उच्च व तंत्र मंत्री उदय सामंत यांनी दिले. त्यानुसार रत्नागिरी शहरातील नागरिकांनी हेल्मेट वापरू नये, असे आवाहनही ना. सामंत यांनी केले.

https://youtu.be/z8Y9F9z9kSM

ना. सामंत यांनी हेल्मेटसक्ती करू नये, या पार्श्वभूमीवर आज अधिकाऱ्यांची तातडीची बैठक आयोजित केली होती. त्यावेळी जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, आरटीओ अधिकारी, पोलीस अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत ना. सामंत यांनी पुणे धर्तीवर रत्नागिरी शहरात हेल्मेट वापराबाबत प्रबोधन करताना हेल्मेटसक्ती करू नये, अशी स्पष्ट भूमिका मांडली. राष्ट्रीय महामार्गावर हेल्मेटसक्ती करावी असेही त्यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात परिपत्रक काढून नागरिकांना आवाहन करावे असेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, ४ तारखेपर्यंत अधिकारी वर्गाने कार्यवाही करावी, असे आदेशही त्यांनी दिले. तसे न झाल्यास नागरिकांनी हेल्मेट वापरू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले. याबाबत सर्व अहवाल आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सादर करणार असल्याचे ना. सामंत यांनी सांगितले.