रत्नागिरी: राजापूर तालुक्यात रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ढगांच्या गडगाडाटासह मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरु झाली. त्यामुळे तालुकावासिय सुखावले आहेत. ढगांच्या गडगडाटासह राजापूरात पाऊस पडू लागला. मागिल काही दिवस तापमानात प्रचंड वाढ झाली होती. त्यामूळे जनता हैराण झाली होती. शेतक-यांची शेताची कामे सुरु होती. मात्र रविवारी पाऊस पडू लागल्याने सर्वच आनंदित झाले. मात्र आंबा पिकाचे काय होणार हा देखील प्रश्न शेतक-यांसमोर निश्चितच पडणार आहे.