दापोली : शिक्षण संस्था संचालित ए.जी हायस्कूलचे म. ल. करमरकर भागशाळा उंबर्ले विद्यालयामध्ये संस्थेचे सेक्रेटरी डॉ. विनोद जोशी यांच्या सहकार्याने आयुर्वेद शिबिर उत्साहात संपन्न झाले.

सदरचे आयुर्वेद विषयी शिबिर महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी घाणेखुट लोटे संचालित एम.इ.एस.आयुर्वेद महाविद्यालय लोटे या कॉलेजचे एन.एस.एस.च्या विद्यार्थ्यांच्या वतीने आयुर्वेद आरोग्य शिबिर घेण्यात आले होते.

यावेळी डॉ. वेदांती कुलकर्णी द्रव्यगुण विभाग सहाय्यक प्राध्यापिका, डॉ. विजय शनवाडे शरीरशास्त्र विभाग सहयोगी प्राध्यापक आणि डॉ. शैला शनवाडे शरीरशास्त्र सहाय्यक प्राध्यापिका यांनी आयुर्वेद विषयी मार्गदर्शन, वैयक्तिक आरोग्य काळजी, सूर्यनमस्कार तसेच घरगुती वापरातील आयुर्वेद वस्तूंविषयी माहिती दिली.

तसेच विद्यार्थी, विद्यार्थिनींचे वेगवेगळे गट करून त्यांच्या समस्या व त्यांना वैयक्तिक मार्गदर्शन यावेळी करण्यात आले .

यावेळी उपस्थित सर्व डॉक्टर व त्यांचे टीम यांचे भागशाळा प्रमुख डी.आर.जाधव यांनी स्वागत केले. तर उपस्थित सर्वांचे आभार मीरा साठे यांनी मानले. यावेळी शिक्षक वृंद, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.