दापोली : तालुक्यातील हर्णे येथील दी हर्णे एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी हर्णे संचलित ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड काॅमर्स हर्णैचा निकाल सलग दुसऱ्या वर्षी 100% लागला आहे.

काॅमर्समध्ये प्रथम क्रमांक कु. मेमन अल्फिया अलीपे 66.00%, द्वितीय क्रमांक कु.खांचे रिम फय्याज 63.33% आणि तृतीय क्रमांक कु. संगमेश्वरी अरबिया इलहान 62.00% हिनं पटकावला आहे.

तसेच आर्ट्समध्ये प्रथम क्रमांक कु. कारभारी महेक इसहाक 69.83%, द्वितीय क्रमांक कु. मजगावकर तासिरा दादामिया 63.50% आणि तृतीय क्रमांक कु. अन्सारी आलिया गुलजार -61.00% हिने मिळवला.

सर्व उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे, मार्गदर्शक शिक्षकांचे व तसेच प्राचार्य नजीर इनामदार यांना दि हर्णै एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष असलम खान, उपाध्यक्ष अली पांगले, सेक्रेटरी हसनमियाँ साखरकर, खजिनदार मुबीन हरगे व सर्व मेंबर तसेच शिक्षक भारती उर्दू संघटनाचे राज्य सचिव मुबीन बामणे सर यांनी शुभेच्छा दिल्या.