माझ्या बॅचमेट पुनावाला पद्मविभूषण मिळाल्याने आनंद, शरद पवारांचे अभिनंदनाचं ट्विट

मुंबई : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येस केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.एकूण १२८ जणांना २०२२ सालासाठीचे पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपीन रावत यांच्यासहीत कल्याण सिंह आणि राधेशाम खेमका यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कारही जाहीर झाला आहे. कला क्षेत्रात प्रभा अत्रे यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. याशिवाय आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.

महाराष्ट्रामधील आणखीन एक खास नाव या यादीमध्ये आहे ते म्हणजे करोना प्रतिबंधक कोव्हिशिल्ड लसीची निर्मिती करणाऱ्या पुण्यातील ‘सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’चे अध्यक्ष सायरस पूनावाला यांचे. त्यांनाही पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे सायरस पूनावाला यांना हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर सध्या करोनाची लागण झाल्याने क्वारंटाइन असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्विट करुन आनंद व्यक्त केला आहे. यावेळेस त्यांनी सायरस पूनावाला यांचा उल्लेख करताना एक खास शब्द वापरला आहे.

भारतामध्ये करोना प्रतिबंधक लसीकरणासाठी सर्वात आधी परवानगी मिळालेल्या पुण्यातील ‘सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’चे अध्यक्ष असणारे सायरस पूनावाला यांना देशातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक असणाऱ्या पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यानंतर शरद पवार यांनी एक खास ट्विट केलंय. “माझा बॅचमेट असणाऱ्या सायरस पूनावाला यांचा मला फार अभिमान वाटतोय. त्यांना औषध क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी पद्मभूषण पुरस्कार जाहीर झालाय,” असे शरद पवार म्हणाले आहेत.

शरद पवार यांनी काल म्हणजेच २४ जानेवारी २०२२ रोजीच करोनाचा संसर्ग झाल्याचे ट्विटरवरुन सांगत आपण सध्या क्वारंटाइन असून डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे उपचार घेत असल्याची माहिती दिली होती.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*