दाभोळ: हमद बीन जासिम औद्योगिक प्रशिक्षण संस्था, दाभोळ येथे शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये विशेष प्राविण्य मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमाला संस्थेचे संचालक कमाल मांडलेकर, लईक महालदार, मुश्ताक मालगुंडकर, तन्वीर सय्यद हे मान्यवर उपस्थित होते.

त्यांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देत मोलाचे मार्गदर्शन केले.

सीबीटी बोर्ड परीक्षा 2025 मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला.

इलेक्ट्रिशन ट्रेडमधून कु. साईनाथ बाळकृष्ण देसाई याने 93.83% गुण मिळवत प्रथम क्रमांक, कु. प्रसाद मनोहर जांगळी याने 92.66% गुणांसह द्वितीय क्रमांक आणि कु. उत्कर्ष विलास घाडे याने 90.00% गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋषिकेश रहाटे यांनी केले.