दापोलीत 23 वर्षीय तरुणावर ब्लेडने वार, हाफ मर्डरचा गुन्हा दाखल

दापोल : शहरातील एस.टी. स्टँड जवळच्या गल्लीत तीन तरूणांनी फाईज इस्माइल रखांगे या २३ वर्षीय तरुणावर ब्लेडने सपासप वार केले. या घटनेमुळे दापोली परीसरात खळबळ माजली आहे.

शनिवारी संध्याकाळी सव्वा सहाच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला. तीन सख्य्या भावांवर हत्या करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी दापोली पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सैफअली नसीर मुल्ला वय २१, साद नासीर मुल्ला २० आणि साकिब नासीर मुल्ला २० मुळ राहणार पंचनदी ता.दापोली या तीन संशयितांवर भादवि ३०७,३४१,५०४,५०६/३४ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दरम्यान हा सगळा प्रकार आपण पैसे दिले नाही म्हणून आपल्याला दोघांनी हात पकडून ठेवले व संशयित सैफअली याने आपल्या डोक्यावर व अन्य शरीराच्या भागावार शेविंगच्या धारदार ब्लेडने सपासप वार केले अशी माहिती गंभीर जखमी झालेल्या फाईज रखांगे यांनी दापोली पोलीसांना दिलेल्या जबाबात दिली आहे.

दापोलीत घडलेल्या या प्रकारामुळे भितीचं वातावरण पसरलं आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक पड्याळ करत आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*