दापोली :- दापोली तालुक्यातील हर्णै येथे एक लाख बेअण्णव हजार (1,92000/-)रूपयाचा गुटखा दापोली येथील रत्नागिरी गुन्हे अन्वेषण विभाग पोलीसांनी जप्त केला.
दापोली पोलीस स्थानकाकडून मिळालेल्या माहितीनुसार विमल पानमसाला तंबाखू 1000 पॅकेट्स हर्णै बाजारपेठ येथील चिकन सेंटरचे पुढील बाजूस रस्त्यालगत असलेल्या जरीफ मुस्तकीन अकबाणी वय 19 याने त्याचे घरा शेजारील पार्किंगशेडच्या पाठीमागील बाजूस एक लाख बेअण्णवहजार रूपयांचा प्रतिबंधित असलेला तंबाखूजन्य (गुटखा) बेकायदेशीर माल विक्रीकरिता साठा करून ठेवला होता.
आज दुपारी एक च्या सुमारास दापोली पोलीसानी केलेल्या कारवाईत सदर माल जप्त करण्यात येऊन आरोपीला अटक करण्यात आली आहे. याबाबत भादवि 272,273 आणि 328 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोउनि कांबळे करित आहेत.