केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे विमानतळावर जंगी स्वागत, अनिकेत पटवर्धन यांना भेटीची संधी

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यानिमित्त आज विमानतळावर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. या प्रसंगी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी अनिकेत पटवर्धन यांना अमित शहा यांची सदिच्छा भेट घेण्याची विशेष संधी मिळाली. ही संधी त्यांना प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनामुळे प्राप्त झाली.

भेटीदरम्यान अमित शहा यांनी कोकणातील राजकीय आणि सामाजिक घडामोडींबाबत विशेष आस्थेने विचारपूस केली.

कोकणातील विकास, स्थानिक समस्या आणि कार्यकर्त्यांच्या भूमिकेवर सौहार्दपूर्ण चर्चा झाली.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*