दापोली : सरस्वती विद्यामंदिर जालगाव येथे ५३ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा शुभारंभ विज्ञानदिंडीच्या जल्लोषात आणि ढोल-ताशांच्या गजरात अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. राज्यमंत्री योगेश कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि सिद्धी शिक्षण संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष समीर गुजराथी यांच्या अध्यक्षतेत हस्ते तीन दिवसीय (४ ते ६ डिसेंबर २०२५) विज्ञान सोहळ्याचे उद्घाटन संपन्न झाले.

प्रदर्शनात तालुक्यातील विविध शाळांमधील सुमारे १९५ विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या १९५ विज्ञान प्रतिकृतींचा समावेश आहे. “विकसित आणि आत्मनिर्भर भारतासाठी S.T.E.M.” या राष्ट्रीय थीमवर आधारित हे मॉडेल्स नवी ऊर्जा, कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, पर्यावरण संवर्धन, शेती, आरोग्य, अंतराळ तंत्रज्ञान आदी क्षेत्रांना स्पर्श करणारे आहेत.

उद्घाटन प्रसंगी बोलताना योगेश कदम म्हणाले, “बालवैज्ञानिकांच्या कल्पना आणि प्रयोगांना बळ देण्याचे काम पालक व शिक्षक करीत आहेत. दापोली तालुक्यातून उदयास येणारे हे बालवैज्ञानिक भविष्यात देशाला विविध क्षेत्रात यश मिळवून देतील आणि विकसित भारत २०४७ च्या स्वप्नाला साकार करण्यात मोलाची भर घालतील.”

यावेळी उपविभागीय अधिकारी विजयकुमार सुर्यवंशी, तहसीलदार अर्चना बोंबे, माजी समाजकल्याण सभापती भगवान घाडगे, माजी नगरसभापती किशोर देसाई, उपनगरसभापती उन्मेष राजे, नगराध्यक्षा कृपा घाग, निलेश शेठ तसेच संस्थेचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष महेश सागवेकर, सदस्य गजानन दाभोळे, गटशिक्षणाधिकारी रामचंद्र सांगडे, सर्व विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापिका सारिका गुजराती, विश्वजित तांबे आदी मान्यवर उपस्थित होते.

सरस्वती विद्यामंदिर जालयोगी मुख्याध्यापक विश्वजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखालील “काजू प्रक्रिया” उपक्रम राज्यस्तरीय इन्स्पायर अवॉर्ड-मानक स्पर्धेत उत्कृष्ट प्रकल्प म्हणून निवडल्याबद्दल योगेश कदम यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

प्रास्ताविकात गटशिक्षणाधिकारी रामचंद्र सांगडे यांनी, “Science, Technology, Engineering आणि Mathematics या चार क्षेत्रांचा समन्वय आज जागतिक स्पर्धेत भारताला पुढे नेणारा ठरणारा आहे. आजचे हे प्रदर्शन केवळ शैक्षणिक उपक्रम नसून भविष्यातील आत्मनिर्भर भारताची पायाभूत मजबूत पाया घालणारी दिशा आहे. विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलता आणि जिज्ञासेला वाव मिळाव मिळावे यासाठी हे प्रदर्शन महत्त्वाचे व्यासपीठ ठरत आहे,” असे मत व्यक्त केले.

प्रारंभी जालगाव केंद्रशाळेपासून ग्रंथ पालखी आणि विज्ञानदिंडी काढण्यात आला. ढोल-ताशांच्या नादात गटशाळाधिकारी रामचंद्र सांगडे, नोडल अधिकारी बळीराम राठोड, सर्व केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक आणि शेकडो विद्यार्थी सहभागी झाला होता.

सूत्रसंचालन आणि आभार स्वागत समिती प्रमुख शशिकांत बैकर यांनी केले.

प्रदर्शन ६ डिसेंबरपर्यंत सर्व नागरिकांसाठी विनामूल्य खुले असून सर्वांनी मोठ्या संख्येने भेट देऊन विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.