गेल्या अनेक दिवसांपासून ५० हजारांपेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळून येणाऱ्या महाराष्ट्राला आज दिलासादायक बातमी मिळाली आहे. अनेक दिवसांनंतर राज्यातील कोरोना आकडेवारी ४० हजारांच्या खाली आली आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ३७ हजार ३२६ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे, तर ६१ हजार ६०७ रुग्णांनी विषाणूवर मात केली असून त्यांना डिस्जार्ज देण्यात आला आहे.