रत्नागिरी : भारतीय स्त्री शक्ती आणि नाट्यशास्त्र विभाग मुंबई विद्यापीठ व मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने नॅशनल शॉर्ट फिल्म स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांचा बक्षीसवितरणाचा कार्यक्रम काल दिनांक 3 जानेवारी रोजी पार पडला. यामध्ये आपल्या रत्नागिरीतील गोगटे जोगळेकर महाविद्यालयाने संपूर्ण भारतातून प्रथम क्रमांक पटकावित सुवर्ण पदक आपल्या नावी केले. महाविद्यालयाच्या ‘हिरो’ या तृतीयपंथीयांवर आधारित शॉर्ट फिल्मला प्रथम क्रमांक मिळाला असून उत्कृष्ट पटकथा हा पुरस्कार शुभम शिवलकर या विद्यार्थ्याला मिळाला आहे. अभिनय आणि तंत्रज्ञान यामध्ये उत्तम काम करत महाविद्यालयाने हे यश संपादन केले आहे.
या शॉर्ट फिल्मचे लेखन व दिग्दर्शन शैलेश इंगळे यांनी केले होते.
तसेच सिनेमॅटोग्राफर ओम पाडाळकर, एडिटिंग आणि विशेष मार्गदर्शन नंदकिशोर जुवेकर, कास्टिंग दिग्दर्शक डॉ. आनंद आंबेकर, पटकथा शुभम शिवलकर, ध्वनी आणि संगीत शैलेश इंगळे, सहाय्यक दिग्दर्शक म्हणून यश सुर्वे आणि राज बोरकर, सहाय्यक सिनेमॅटोग्राफर अभिजित जोशी आणि आदित्य दशवंतराव, रंगभूषा नेहा शर्मा आणि सिध्दी कदम, वेशभूषा मिथिला नाखरेकर आणि अनुजा जोशी, संघ समनव्यक प्रो. शुभम पांचाळ, संघ व्यवस्थापक प्रसाद साळवी आणि शुभम नंदाणे यांनी काम केले. या शॉर्ट फिल्मच्या निर्मितीसाठी दिग्दर्शक नंदकिशोर जुवेकर आणि मयूर दळी यांचे विशेष मार्गदर्शन मिळाले. तसेच महाविद्यालयाचे 1995 चे माजी विद्यार्थी व कोंकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी श्री. सचिन देसाई व मा. रेल्वे प्रबंधक श्री. शेंडगे साहेब यांचे विशेष सहाय्य लाभले.महाविद्यालयाचे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे नेहमीच प्रोत्साहन असते विशेष करून प्रसाद गवाणकर यांचे मार्गदर्शन सतत असते
या शॉर्ट फिल्ममध्ये शुभम शिवलकर याने प्रमुख भूमिका साकारली होती. तसेच सम्यक हतखंबकर,नेहा शर्मा, शुभम नंदाणे, आर्या वंडकर, मिथिला नाखरेकर, अनुजा जोशी, सिध्दी कदम, सिद्धांत सरफरे, कौस्तुभ आंब्रे, सिध्दी गुरव, यश सूर्वे, अभिजित जोशी, राज बोरकर, आदित्य दशवंतराव यांनी इतर भूमिका साकारल्या.
यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.आनंद आंबेकर व समन्वयक प्रा. शुभम पांचाळ यांचे प्रभारी प्राचार्य डॉ.प्रफुल्लदत्त कुलकर्णी, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ.मकरंद साखळकर, वाणिज्य शाखा उपप्राचार्या डॉ.यास्मिन आवटे, कला शाखा उपप्राचार्य डॉ.सुरेंद्र ठाकूरदेसाई, विज्ञान शाखा उपप्राचार्या डॉ.अपर्णा कुलकर्णी विशेष म्हणजे रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्षा श्रीमती शिल्पाताई पटवर्धन कार्यवाह श्री सतीश शेवडे यांनी विशेष अभिनंदन केले आहे. अभिनंदन केले व पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.