सिंधुदुर्गातून गोव्यात येणाऱ्यांची कडक तपासणी करण्याचा गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचा निर्णय

सिंधुदुर्ग:- सिंधुदुर्गातून गोव्यात येणाऱ्यांची कडक तपासणी केली जाईल, अशी माहिती गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी येथे दिली. तेथून येणाऱ्या नागरिकांच्या तपासणीसाठी खासगी प्रयोगशाळांची मदत घेतली जाईल, असेही ते म्हणाले.
गोव्यातील काहींना डेल्टा विषाणूचा संसर्ग झाला होता ही गोष्ट मुख्यमंत्र्यांनी मान्य केली. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले की, कणकवली येथे एका व्यक्तीला डेल्टा प्लस या घातक विषाणूचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाल्यामुळे गोवा सरकारने त्याची गंभीर दखल घेतली आहे. सीमेवर कडक स्क्रिनिंग केले जाईल.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*